१९९४ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अभयलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली. ४२८
सभासद आणि केवळ चाळीस हजाराच्या भागभांडवलावर सुरू झालेली ही संस्था आज हजारो सभासदांना मदत
करणारी “आधारवड' झाली आहे. संस्थेची स्थापनाही एका विलक्षण विचारांनी झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रातील तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले होते की, “समाजातील
मूलगामी अशा काही प्रश्नांचा विचार नवीन पिढीला करावा लागणार आहे. काही आव्हाने स्वीकारावी लागणार
आहेत. ती आव्हाने देशातील गरीब, दरिद्री, असंघटित समाजाबद्दलची असतील.
प्रिय सभासद, बंधू-भगिनी, ठेवीदार व हितचिंतक मित्रांना सप्रेम नमस्कार...
“अभयलक्ष्मी'... छोट्याशा का असेना, परंतु एका विशिष्ट अशा समूहाचे, समाजाचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न मनात ठेवून
२५ वर्षांपूर्वी सुरू केलेली अभयलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी. ही संस्था आज आपला 'रौप्यमहोत्सव' अत्यंत आनंदाने
आणि उत्साहाने साजरा करीत आहे. जे स्वप्न उराशी बाळगले होते, ते काही प्रमाणात साकार होताना पाहून मनस्वी समाधानाने
हा सोहळा आपण संपन्न करीत आहोत. या निमित्ताने अभयलक्ष्मीच्या स्थापनेचा आणि वाटचालीचा जीवनपट आपणासमोर
उलगडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
लक्ष्मीचे वरदान लाभलेल्या मुंबई महानगरीत रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी आलेली आपण सारी मंडळी, जवळपास
सर्वजण शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील हजारो वर्षांची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दारिद्र्याची पार्श्वभूमी असलेला आपला
समाज, आपल्या अगोदरच्या एक-दोन पिढ्या मुंबईत आल्या आणि या मायानगरीच्या गतिमान, कृतीशील विचारांनी प्रभावित
झाल्या. आपल्या विकासाचा, समृद्धीचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. याच कालखंडात सहकाराच्या माध्यमातून
सर्वसामान्य जनतेच्या परिवर्तनाचा नवा विचार मूळ धरू लागला होता. त्या-त्या परिसरातील गोरगरीब, श्रमजीवी समाजाला
संघटित करून त्यांचा आर्थिक विकास घडवून आणणाऱ्या अनेक सहकारी संस्था त्यावेळी स्थापन झाल्या सर्वार्थाने प्रगतीकडे
झेपावत असलेल्या आपल्या समाजाच्या वाटचालीत या सहकारी संस्थांचे योगदान फार मोठे आहे हे नाकारून चालणार नाही.
सुरुवातीच्या काळात ज्या ध्येयवादाने प्रेरित होऊन या संस्था कार्यरत होत्या, तो ध्येयवाद कालांतराने कमी-कमी होत गेला
आणि काही अपप्रवृत्ती सहकारात शिरल्या. परिणामी काही संस्थांचा कालावधी अल्पजीवी ठरला. दरम्यानच्या काळात खुल्या
अर्थव्यवस्थेची, जागतिकी करणाचे वारे देशात वाहू लागले. संगणक प्रणालीने क्रांती केली. स्पर्धेचे गतिमान युग अवतरले.
सहकारी संस्थांपुढे नवी आव्हाने निर्माण झाली. या नव्या वादळात अनेक संस्था हवेत विरून गेल्या. मात्र स्वतःमध्ये काळानुरूप
बदल घडवत पारदर्शक, सचोटीचा कारभार करणाऱ्या संस्था या कठीण परिस्थितीतही टिकून राहिल्या, यशस्वी वाटचाल करीत
राहिल्या. मला स्वाभिमानाने सांगावेसे वाटते की, आपली “अभयलक्ष्मी' त्यापैकी एक आहे. आपल्या समूहाचा केवळ
आर्थिकच नव्हे, तर सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असलेली ध्येयवादी संस्था म्हणून अभयलक्ष्मी को-आर्पे. क्रेडिट
सोसायटी आज नावारुपाला आली आहे.
१९९४ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर तत्कालीन सहकारमंत्री मा. स्व. अभयसिंह राजे भोसले यांच्या मान्यतेने
अभयलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ची स्थापना झाली. ४२८ सभासद आणि केवळ चाळीस हजाराच्या भागभांडवलावर
सुरू झालेली ही संस्था आज हजारो सभासदांना मदत करणारी 'आधारवड' झाली आहे. संस्थेची स्थापनाही एका विलक्षण
विचारांनी झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रातील तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना
म्हटले होते की, “समाजातील मूलगामी अशा काही प्रश्नांचा विचार नवीन पिढीला करावा लागणार आहे. काही आव्हाने
स्विकारावी लागणार आहेत. ती आव्हाने देशातील गरीब, दरिद्री, असंघटित समाजाबद्दलची असतील. विशेषतः निर्धन बहुजन
समाज, छोटे शेतकरी, शेतमजूर, औद्योगिक कामगार, श्रमजीवी कामगार, भारवाहक, कास्तगीर, छोटा व्यावसायिक, फिरतेव्यापारी यांच्या संबंधातील ती आव्हाने आहेत. महाराष्ट्रासमोरील अशा काही गंभीर समस्यांचा विचार आता नव्या पिढीला,
तरुणांना करावा लागणार आहे. त्यांनी हा विचार केला, रक्तात भिनवला आणि त्याला कृतिशील कार्यक्रमाची जोड दिली तरच
देशाचे, समाजाचे चित्र बदलू शकेल.'' स्व. चव्हाण साहेबांच्या या विचारांनी प्रभावित होऊन आपणही काहीतरी करावे असे
आमच्या तरुण मनाने ठरवले. गुरुवर्य ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे यांचा आदर्श समोर होताच. त्यांच्याच प्रेरणेने आणि
आशीर्वादाने 'अभयलक्ष्मी'ची स्थापना झाली. कै. शिवराम संभू बोभाटे (मास्तर), कै. रामचंद्र कणसे, कै. राजाराम पवार, श्री.
केशवशेठ पुजारी, श्री. प्रकाशशेठ बागवे, श्री. हनुमंत आंबेकर या सर्वांचे मौलिक सहकार्य लाभले आणि केवळ एका
कर्मचाऱ्याच्या नियुक्तीवर संस्थेचे कामकाज सुरू झाले. भाड्याच्या जागेतून सुरू झालेला संस्थेचा प्रवास संस्थापक सहकाऱ्यांच्या
अथक प्रयत्नातून अगदी कमी वेळात म्हणजे केवळ दोन वर्षात स्व-मालकीच्या जागेत स्थलांतरित झाला. मनाशी बाळगलेले
स्वप्न साकारण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे, जिद्दीने संस्थेच्या उभारणीत झोकून देऊन काम केले. म्हणूनच संस्थेचे आजचे
बहरलेले रूप पाहून खूप आनंद होतो. सभासदांबरोबरच संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही भविष्य उज्ज्वल व्हायला
पाहिजे हा विचार सतत मनी-मानसी होता. कमीत कमी २० कर्मचारी असले तरच भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) योजना
चालू करता येते असा कायदा असतानाही 'अभयलक्ष्मीने केवळ तीन कर्मचारी असताना त्यांचा भविष्य निर्वाह निधी
(पी.एफ.) सुरू केला. महाराष्ट्रातील हे दुर्मिळ उदाहरण असून आपल्या समूहाचे भविष्य खऱ्या अर्थाने घडविण्यासाठी केलेल्या
प्रयत्नांचा तो एक भाग होता असे मी मानतो. अत्यंत सुलभ-सुरक्षित कर्ज योजना, ठेवीदारांना अधिकचा लाभ देणाऱ्या अभय-
ठेव योजना, एकही पैसा भाडे न घेता उपलब्ध करून दिलेली सेल्फ डिपॉझीट लॉकर योजना अशा विविध उपक्रमांची जोड
देऊन संस्थेने अल्पावधीत सर्वांचा विश्वास संपादन केला. गुरुवर्य ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांचा आध्यात्मिक वारसा
लाभलेल्या अभयलक्ष्मी'ला पुढील काळात महाराष्ट्र भूषण ह.भ.प. बाबामहाराज सातारकर व ह.भ.प. प्रमोदमहाराज जगताप
यांच्या सात्त्विक विचारांचे मार्गदर्शन लाभले. संत-महंतांचे आशीर्वाद आणि आपला प्रभावी, पारदर्शक कारभार याच्या बळावर
अभयलक्ष्मीने मोठी झेप घेतली. मुंबईसारख्या श्रीमंत शहरात एक हजार चौरस फुटाचे स्व-मालकीचे वाताणूकुलीत-अद्ययावत
मुख्य कार्यालय संस्थेच्या गगनभरारीची साक्ष देत आहे. संगणकीय सुविधांनी सुसज्य अशा या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटन
करण्यात आले. सभासदांच्या सोयीकरीता आणि आपल्या कार्यकक्षा रुंदावण्याच्या उद्देशाने संस्थेने मुलुंड, कामोठे येथे ही
शाखा सुरू करण्यात आल्या. या शाखांना लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ठाणे शहरातही नवीन शाखा सुरू करण्यात आली.
या शाखेचे उद्घाटन गुरुवर्य ह.भ.प. प्रमोदमहाराज जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. समाजाचे वैचारिक प्रबोधन करणाऱ्या
वारकरी संप्रदायातील शुद्ध, सात्त्विक, प्रसन्न करकमलांनीच अभयलक्ष्मीने आपली नवी दालने सुरू करावीत हा त्यामागील
परमार्थिक हेतू.
अभयलक्ष्मीची २५ वर्षांची ही दैदिप्यमान वाट चालताना संस्थेच्या निकोप वाढीसाठी प्रसंगी कठोरपणे निर्णय घेतले
संस्थेच्या काटेकोर कामकाजाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवले. संस्थेला सातत्याने अ' ऑडीट वर्ग मिळत गेला आणि तिसऱ्या
वर्षापासून आम्ही सभासदांना लाभांश देऊ शकलो हे या चोख कामकाजाचे फल स्वरुप आहे. संस्थेच्या या उज्ज्वल यशात
सहकार क्षेत्रातील अनेक नामवंतांचे मार्गदर्शन लाभले, साथ मिळाली. मा. आ. जयंतभाई पाटील, श्री. भाई वांगडे, श्री.
राजाराम निकम (नाना), कै. शंकरराव पवार, कै. ऑड. हरिभाऊ गोळे, श्री. शामरावशेठ पिसाळ, श्री. काशिनाथ मोरे, श्री.
सुधीर राऊत, श्री. शिवाजीराव नलावडे, आमदार श्री. प्रवीण दरेकर, श्री. राजाराम परामणे, श्री. जगन्नाथ बेलोशे, श्री. शांताराम
आग्रे, श्री. प्रभाकर बेलोशे, श्री. अशोक गोळे, डॉ. शिल्पा काकड, श्रीमती भारती पाटील, कै. अरुण मानकर, कै. श्रीकांत
आंब्रे, श्री. बसंतशेठ गोगरी आदी मान्यवरांचा या निमित्ताने क्रणनिर्देश करणे माझे कर्तव्यच आहे. त्याच बरोबर संस्थेचे सर्व
सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी दाखविलेला विश्वास संस्थेसाठी व व्यक्तीशः माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. आपल्या
सर्वांच्या निष्ठेचा आणि प्रेमाचा आम्ही आदर करतो. संस्थेने घेतलेली ही भरारी आपल्या सहकार्यामुळेच शक्य झाली आहे. संस्थेच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आपण आहात, आम्ही मात्र निमित्त आहोत. तुकोबारायांच्या शब्दात सांगावयाचे तर "केवळ
भारवाहक... केवळ आर्थिक परिवर्तनातून सुखी-समाधानी समाजाची निर्मिती होणार नाही, तर त्याला वैचारिक प्रबोधनाची आणि
संस्कारमय गुणवत्तेची जोड द्यावी लागेल याची जाणीव मनात ठेवून अभयलक्ष्मी को-ऑप-क्रेडिट सोसायटीच्या जोडीला
अभयललक्ष्मी प्रतिष्ठानची उभारणी आपण केली. संस्था आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रबोधनाबरोबरच मदतीची सहकार्याची
परंपरा सुरू केली. “ प्रबोधनाशिवाय परिवर्तन नाही, आणि ज्ञान हे प्रबोधनाचे मुख्य साधन आहे.'' हा वारकरी संप्रदायाचा
संदेश प्रमाण माणून अभयलक्ष्मी प्रतिष्ठानने शैक्षणिक उत्थानाचे अनेक उपक्रम आपल्या समूहामध्ये राबविले. संत नामदेव
महाराजांच्या नाचू कीर्तनाच्या रंगी । ज्ञानदिप लाऊ जगी ।।' या अभंगाचा मागोवा घेत प्रतिष्ठानने आध्यात्मिक नामयज्ञ
सोहळ्यांना महतीची भूमिका घेतली. दुर्गम डोंगरी भागात राहणार्या गरीब विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व शालेय साहित्याचे वाटप
सुरू केले, आत्तापर्यंत अनेक शाळांमधील जवळपास बारा हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. अंध मुलांच्या
शिक्षणासाठी ब्रेल लिपीतील लॅपटॉप देण्याचा उपक्रमही प्रतिष्ठानने राबवला. त्याच पद्धतीने इतर पाच शाळांना संगणक संच भेट
देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या संगणकीय शिक्षणाची सोय आपण पूर्ण केली. आत्तापर्यंत दहा गुणवान विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी
आर्थिक मदत देण्यात आली असून भविष्यातही गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहकार्याचा हात देण्याचा
प्रतिष्ठानचा संकल्प आहे. हे करीत असताना श्रीगुरु महंत प्रमोदमहाराज जगताप यांच्या “सुजन वाकय कानी पडो" या प्रवचन
मालिकेला सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित करण्यात अभयलक्ष्मी प्रतिष्ठानने प्रमुख भूमिका बजावली. महाराष्ट्राचे लोकप्रिय
नेते स्व. आर. आर. पाटील (आबा) व वारकरी संप्रदायातील क्रषितुल्य व्यक्तिमत्त्व गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर
यांच्या उपस्थितीत ह.भ.प. प्रमोदमहाराजांचा 'कार्य गौरव' सोहळाही प्रतिष्ठानने साजरा केला. ज्ञान प्रसाराचे हे कार्य करीत
असतानाच नि:स्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून
अनेकांना सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या संस्थापक मंडळातील आमचे सहकारी स्व. शिवराम बोभाटे मास्तर यांच्या
सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या एकसष्टीचा भव्य सोहळा संस्थेच्या सहकार्याने लोकवर्गणीतून साजरा केला. मुंबईचे चे
तत्कालीन महापौर श्री. महादेव देवळे व ह.भ.प. प्रमोदमहाराज जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला तो कार्यक्रम आजही
अनेकांच्या स्मरणात आहे. अभयलक्ष्मी प्रतिष्ठानने समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना त्यांच्या आजारपणात वैद्यकीय उपचारासाठी
आर्थिक मदत करण्यातही पुढाकार घेतला. हे सर्व उपक्रम राबविताना येथ सेवा हाच दारवंटा' ही उदात्त भावना आपल्या
सर्वांच्या मनात होती व पुढेही ती तशीच राहील.
विलक्षण ध्येयवादाने स्थापन केलेल्या 'अभयलक्ष्मी' सोसायटीचा रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न होत असताना माझे मन
भावभावनांच्या हिंदोळ्यावर आनंदाचे हेलकावे घेत आहे. या २५ वर्षातील दिव्य वाटचाल नजरेसमोर प्रकाशमान झाली आहे.
स्थापनेपासून सलग २१ वर्षे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत असताना आलेल्या अनेक कटू-गोड अनुभवांची शिदोरीही
सोबत आहे. या काळात अभयलक्ष्मीला लाभलेले सर्व संचालक सेवाभावी वृत्तीने काम करणारे होते व आहेत. आत्ताचे
विद्यमान संचालक मंडळ तर उच्च विद्याविभूषित तज्ञांचा संचच आहे. या सर्वांचा गौरवाने उल्लेख करताना मला त्यांचा अभिमानही
वाटतो. या संचालकांच्या साथीला असलेला सेवाभावी वृत्तीचा, प्रशिक्षित कुशल कर्मचारीवृंद आणि कशळू-प्रामाणिक दैनंदिन ठेव
प्रतिनिधी ही आपल्या संस्थेची शक्ती आहे असे मी मानतो. या सर्वांच्या प्रयत्नातान आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून
अभयलक्ष्मी को-ऑप क्रेडिट सोसायटीचे भविष्य उज्ज्वल, दैदिप्यमान आणि समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.
अभयललक्ष्मीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात महानुभावांचे क्रण व्यक्त करून आपणास मनःपूर्वक
शुभेच्छा ! धन्यवाद. ..!
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय सहकार !!!